अश्विन महिन्यात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. मस्तकावर घंटेच्या आकराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला 'चंद्रघंटा देवी' असं म्हटलं जातं. देवी दुर्गेच्या तिसर्या शक्तीचं नाव 'चंद्रघंटा' आहे. संकट निवारणासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते. या दिवशी साधकाचं मन 'मणिपूर' चक्रात प्रविष्ट होतं. चंद्रघंटेच्या कृपेनं अलौकीक वस्तूचं दर्शन होतं. या दिवशी दुधापासून बनवलेली मिठाई, ड्राय फ्रुट्स बर्फी इत्यादी अर्पण करू शकता. चंद्रघंटा मातेला सिंदूर, अक्षत, अगरबत्ती, धूप आणि फुले अर्पण करा. तिसऱ्या दिवशीच्या पूजेमध्ये दुधापासून बनवलेल्या वस्तू किंवा सुक्या मेव्याचा नैवेद्य दाखवावा.