ज्योतिष शास्त्रात शनीच्या वक्री (Shani Dev) चालीला फार महत्त्व आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत शनीची ही वक्री चाल असणार आहे. मेष रास (Aries) मेष राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल फार आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुमच्या आरोग्याबाबत अजिबात निष्काळजीपणा करू नका. तुमच्या तब्येतीबाबत तुम्ही सतर्क राहा. वृषभ रास (Taurus) या काळात तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच, करिअरशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना सावध राहा. तुमचा एकही चुकीचा निर्णय तुम्हाला महागात पडू शकतो. मकर रास (Capricorn) या राशीच्या लोकांनी शनीच्या वक्री चालीच्या दरम्यान सतर्क राहण्याची गरज आहे. तुम्हाला पैशांची आर्थिक चणचण भासू शकते. त्यामुळे तुम्हाला अधिक सावधान राहण्याची गरज आहे. कुंभ रास (Aquarius) शनी आपल्याच राशीत म्हणजे कुंभ राशीत उलटी चाल चालणार आहेत. तुमच्यासमोर अनेक आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होतील. पण या काळात खचून जाऊ नका.