पहिली अंघोळ म्हणजे अभ्यंगस्नान आणि हे अभ्यंगस्नान नरक चतुर्दशी दिवशी केलं जातं.
दिवाळीतील महत्त्वाचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशीचा.
या दिवशी नरकासूराचा वध करण्यात आला होता.
वैज्ञानिक गोष्ट अशी सांगितली जाते की, अश्विन महिन्यात म्हणजेच दिवाळीच्या काळात हिवाळा सुरू झालेला असतो.
फार थंडी असते. त्यामुळे आपल्या शरीराचे तापमान योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी हे कडू फळ चाखलं जातं.'
नरकासुर नावाच्या एका असूर राजाची भगवान श्रीकृष्णाच्या काळात मोठी दहशत होती.
तो इतरांना फार त्रास द्यायचा, स्त्रियांशी वाईट वागायचा, त्यामुळे जनता त्याला फार त्रासली होती.
ही गोष्ट जेव्हा श्रीकृष्णाला कळली तेव्हा त्याने सत्यभामेसह त्या असूरी राजावर आक्रमण केलं आणि त्याचा वध केला.
त्याच्या वधाचं प्रतिक म्हणून आपण हे कडू फळ फोडतो.
त्याचा रस जिभेला लावतो आणि 2 बिया डोक्याला लावतो. याबाबत असं सांगण्यात येतं की, ‘ते फळ फोडून आपण आजच्या काळातील प्रतिकात्मक नरकासूराचा वध करतो.