शनिवार (Saturday) हा दिवस काही खास आहे. हा दिवस भैरवदेवाला आणि शनिदेवाला (Shani Dev) समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आपल्या जीवनात चांगल्या कर्माचं फळ देणारा आणि वाईट कर्मांची शिक्षा देणारा हा शनि आहे. शनिवारी काही गोष्टी अजिबात खरेदी करू नये? जाणून घेऊया. लोखंड हा शनिदेवाचा धातू मानला जातो, त्यामुळे या दिवशी चुकूनही लोखंड किंवा लोखंडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू नयेत. शनिवारी कोणी मीठ देखील खरेदी करू नये. जर तुम्ही शनिवारी घरात मीठ आणलं तर कुटुंबात नकारात्मकता पसरू शकते. शनिवारच्या दिवशी धारदार वस्तू जसं की सुया, कात्री, चाकू इत्यादी खरेदी करून घरी आणू नये. शनिवारी शूज आणि चप्पल खरेदी करणं देखील अशुभ मानलं जात नाही. शनिवारच्या दिवशी दिवशी झाडू खरेदी करणंही टाळावं. काळा रंग शनि शनिदेवाशी संबंधित मानला जातो, त्यामुळे शनिवारी काळ्या रंगाचे कपडे कधीही खरेदी करू नयेत. शनिवारी शनिदेवाच्या पूजेदरम्यान त्यांना मोहरीचे तेल अर्पण केलं जातं, त्यामुळे शनिवारी कधीही मोहरीचं तेल खरेदी करू नये