ज्योतिषशास्त्रानुसार, या जन्मतारखेचे लोक हे प्रचंड घमंडी असतात. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो. मूलांक 1 चे लोक हे स्वभावाने गर्विष्ठ आणि हट्टी असतात. आपल्यालाच जणू सर्व काही माहीत असल्याचं त्यांना वाटतं, समोरच्या व्यक्तीला ते कमी लेखतात. 1, 10, 19 किंवा 28 जन्मतारखेच्या लोकांमध्ये श्रवण क्षमता कमी असते. ते दुसऱ्याचं नीट ऐकून घेत नाहीत. मूलांक 1 चे लोक फार घमंडी असतात. ते नेहमी ताठ मानेने चालतात आणि दुसऱ्यांना कमी लेखतात. मूलांक 1 चे लोक त्यांच्या पडत्या काळातही सावरतं घेतात, ते जास्त खचून जात नाहीत. मूलांक 1 चे लोक धाडसी असतात आणि धोका पत्करणारे असतात. कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेले लोक त्यांच्या मेहनतीने आणि क्षमतेने सरकारी नोकरी मिळवण्यात यशस्वी होतात. एखाद्याच्या समोर एक आणि मागून एक बोलण्याची सवय त्यांना नसते. दुतोंडीपणा यांना आवडत नाही. 1, 10, 19, 28 जन्मतारखेचे लोक कला, संगीत, लेखन आणि डिझाईन यांसारख्या क्षेत्रातही यश मिळवतात.