हिंदु धर्मात मृतदेह जाळण्याची परंपरा का जोपासली जाते? या सर्व प्रथा-परंपरा मानण्यामागे अनेक मान्यता आहेत.
हिंदू धर्मात मृत्यू आणि पुनर्जन्म या दोन्ही गोष्टींबाबत मान्यता आहे. केवळ शरीर मरतं, पण त्या व्यक्तीचा आत्मा कायम अमर असतो, असंही मानलं जातं.
आत्मा नव्या शरीरासह नवा जन्म घेतो, अशीही मान्यता आहे.
हिंदू धर्मात अग्नीला पवित्र मानलं जातं. ते भौतिकरित्या त्या शरीराला पृथ्वीवरून काढून टाकतं आणि त्यासोबतच आत्मा आपला नवा प्रवास सुरू करतो.
धार्मिक मान्यतेनुसार, पवित्र अग्नी शरीराला शुद्ध करतो. मृत्यूनंतर आत्मा त्याचं नवं जीवन सुरू करतो आणि नंतर नव्या शरीरासह जन्म घेतो.
मानवी शरीर हे पाच तत्वांनी बनलेलं आहे आणि मृत्यूनंतर मृतदेहाला मुखाग्नी दिल्यानंतर शरीराची राख होते.
त्यानंतर त्या व्यक्तीच्या अस्थी (शरीराची राख) एकत्र करुन, नंतर ती एकत्र करून वाहत्या पाण्यात टाकली जाते.
यासोबतच असं मानलं जातं की, देह जाळल्यानंतरच मृत व्यक्तीला या जगातून मुक्ती मिळते आणि आत्मा नव्या शरीरात जाण्यासाठी मुक्त होतो.
त्यामुळेच हिंदू धर्मातील मान्यतांनुसार, मृतदेहाला मुखाग्नी दिला जातो.