राहूची उलटी चाल काही राशींचं नशीब उजळवू शकते. राहू हा मायावी ग्रह आहे. राहू मे 2025 मध्ये उलट चाल चालून शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल. 372 दिवसांच्या काळात राहू कोणत्या राशींसाठी शुभ ठरेल? जाणून घेऊया. मेष रास (Aries) राहूचं संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ मानलं जातं. तुमच्याकडे अशा जागेवरुन पैसा येईल जिथून तुम्ही विचारही केला नसेल. वृश्चिक रास (Scorpio) तुम्हाला नशीब पूर्ण साथ देईल. तुम्हाला या काळात केलेल्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. सिंह रास (Leo) व्यवसाय करणाऱ्या लोकांना या काळात चांगला नफा मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ मानला जात असून तुमच्या कुटुंबात चांगली धनसंपत्ती राहील.