गणपतीला मोदक, शंकराला दुधाचा नैवेद्य दाखवला जातो अशा प्रकारे देवाला आवडणारा नैवेद्य दाखवला तर देव प्रसन्न होतो अशी आपली श्रद्धा असते.

पूजेत नैवेद्य अर्पण करणे आणि त्यानंतर प्रसादाचे वाटप करणे हाही पूजेचा एक महत्त्वाचा भाग आहे.

देव नैवेद्याला सूक्ष्म अंशाने चाखत असतो तेव्हाच देवासमोर ठेवण्यात आलेल्या पदार्थाला जास्तीत जास्त गोडवा असतो.

पण, देवाला नैवेद्य नेमका का दिला जातो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

परमेश्वर खात नसला तरी नैवेद्य परमेश्वराला कृतज्ञतेने अर्पण करणाऱ्या भक्तामध्ये फार बदल घडून येतो.

देवाप्रती असलेली कृतज्ञता भक्ताच्या जीवनात नम्रता आणते आणि या कृतज्ञतेमुळे किंवा नम्रतेमुळे त्याचे जीवन आनंदी होते.

म्हणून मंदिरात देवापुढे नैवेद्य दाखवला जातो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)