देवळात पाय ठेवताच आपण सर्वप्रथम देवळात बांधलेली घंटा आवर्जून वाजवतो
खरंतर ही घंटा वाजवण्यामागे नक्की कारण काय आहे?
मंदिरात घंटा का असते? ती का वाजवली जाते?
घंटा वाजवून मंदिरात आपण आपली उपस्थिती दर्शवतो.
जेव्हा मंदिरात घंटा वाजते तेव्हा वातावरणामध्ये ध्वनींचे मोठं वर्तुळ निर्माण होतं.
हे वर्तुळ वातावरणाला ऊर्जा करतात.
जितक्या वेळा घंटा वाजतात तेवढ्या वेळा वातावरणामध्ये विद्युतशक्ती निर्माण होत असते.
मंदिरात दर्शनासाठी येणारे भक्त घंटा वाजवून मंदिराच्या वातावरणाला जास्तीत जास्त शक्तिशाली बनवितात.
मंदिरात प्रवेश करताच आपण जी घंटा वाजवित असतो त्या घंटेचा आवाज आपल्या मेंदूला अचका देत असतो. या अचक्यामुळे बाहेरच्या जीवनातील भौतिक विचारांपासून काही काळ पण दूर राहतो.
प्रत्येक वेळी घंटानाद केल्याने उत्पन्न होणारा ध्वनी-प्रतिध्वनीच्या वर्तुळाचे गुंजन मंदिराच्या वातावरणामध्ये
एक विद्युत शक्ती निर्माण करते जी दिसत नाही पण ती अनुभवता येते.
मंदिरातील घंटा वाजवल्याने अनेक कंपनं निर्माण होतात. त्यामुळे वातावरणातील विषाणू, सूक्ष्मजीव तसेच जीवजंतू नष्ट होतात.