याला विजयादशमी असंही म्हणतात. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवसाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे.
या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता, त्यामुळे या दिवशी रावण दहनही केलं जातं, यासोबत या दिवशी शस्त्रांची पूजाही केली जाते. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं सोनं म्हणून वाटली जातात.
या दिवशी धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते, त्याचं प्रतीक म्हणून सोनं म्हणजेच आपट्याची पानं, पाटी-पुस्तक अर्थात सरस्वती देवी आणि शस्त्रास्त्रांचं पूजन केलं जातं.
दसऱ्या दिवशी सर्व लोक एकमेकांना आपट्याची पाने वाटतात. आपट्यांच्या पानांची एक पौराणिक कथा आहे.
रघुकुल श्री राम यांनी त्यांची संपत्ती दान करून वान प्रस्थाश्रमास गेले तेव्हा कुलगुरू कौत्स मूनी येथे आले.
त्यांनी त्या राजांकडे 14 कोटी सुवर्ण मुद्रा दान म्हणून मागितली पण तेव्हा ते वास्तविक राजा नसल्याने ते धन नव्हते देऊ शकत
तरीही गुरुंची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी इंद्रदेवांना युद्धाचे आव्हान दिले.
पण त्या युद्धात इंद्रदेवांचा पराभव झाला. त्यानंतर त्या राजांनी मला तुमचं राज्य नको, 14 कोटी सुवर्ण मुद्रा हव्या आहेत, अशी मागणी इंद्रदेवांकडे केली.
तेव्हा इंद्रदेवांनी पृथ्वीवरील आपट्याच्या झाडावर आम्ही सुवर्ण मुद्रा सोडतो.
त्याप्रमाणे इंद्रदेवांनी आपट्याच्या पानांच्या रूपाने सोन्याचा वर्षाव केला. त्यामुळे आपट्याचे पान आपण विजयादशमीला सोने म्हणून लुटतो.
आपट्याच्या पानांना सोन्याचे प्रतीक मानले जाते.
अशी आख्यायिका सांगितली जाते असे तज्ज्ञ म्हणतात. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याची पाने वाटली जातात आणि 'सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा' असं म्हणतात.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही