हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला दसरा साजरा केला जातो.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

नवरात्रीच्या दशमीच्या दिवशी दसरा साजरा करण्याची परंपरा आहे.

Image Source: pexels

त्यानुसार, यंदा दसरा येत्या 12 ऑक्टोबर रोजी म्हणजेच उद्या साजरा केला जाणार आहे.

Image Source: pexels

असं म्हणतात की, दसऱ्याच्या शुभ दिवशी काही उपाय केल्यास वर्षभर त्याचा प्रभाव आपल्यावर राहतो.

Image Source: pexels

हाती घेतलेल्या कार्यात मिळेल यश

तुमच्या कार्यात यश किंवा कोणत्याही समस्येपासून सुटका हवी असल्यास दसऱ्याच्या दिवशी अपराजिताच्या रोपाची पूजा करा.

Image Source: pexels

रोगांपासून होईल सुटका

दसऱ्याच्या दिवशी रोगांपासून मुक्ती हवी असल्यास सुंदरकांडचा पाठ करा.

Image Source: pexels

धन-लाभ होईल

व्यवसायात प्रगती हवी असल्यास दसऱ्याच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र , नारळ, मिठाई यांसारख्या वस्तू ब्राह्मणाला दान करा.

Image Source: pexels

दारिद्र्य होईल दूर

सर्वात मोठं दान हे गुप्त दान असतं असं म्हणतात. यासाठी दसऱ्याच्या दिवशी गुप्त पद्धतीने ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला अन्न, वस्त्रदान करा.

Image Source: pexels

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.

यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pexels