3 जूनला गुरु ग्रहाचा वृषभ राशीत उदय होणार आहे.गुरु ग्रहाला देवतांचा गुरु म्हटलं जातं.

ज्या राशीत गुरु ग्रह उच्च स्थानावर असेल, त्या व्यक्तीचं भाग्य लवकरच उजळणार आहे.

वृषभ राशीत गुरु ग्रहाच्या उदयामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे हे जाणून घेऊयात.

मेष रास

या राशीच्या दुसऱ्या चरणात देवगुरुचा उदय होणार आहे. त्यामुळे नशिबाची साथ मिळेल. या काळात तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते.

कर्क रास या राशीच्या लोकांच्या अकराव्या चरणात देवगुरूचा उदय होईल. या काळात तुम्हाला प्रमोशनची संधी मिळेल.

कन्या रास या राशीच्या नव्या चरणात देवगुरु गुरूचा उदय होणार आहे. या काळात तुम्हला नशीबाची साथ मिळेल. नवीन प्रयत्न फायदेशीर ठरतील.

वृश्चिक रास या राशींच्या लोकांच्या सातव्या चरणात उदय असेल. चांगल्या विचारवंतांच्या मदतीने तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल.

कुंभ रास या राशीच्या लोकांच्या चौथ्या चरणात उदय होईल.या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात चांगला नफा मिळेलं.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.