ज्यांच्यावर देवी लक्ष्मी कृपा करते, त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
जीवनात सुख-सुविधा मिळवण्यासाठी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे.
कठोर परिश्रम करूनही सकारात्मक परिणाम मिळत नाही.
हळूहळू श्रीमंतही गरिबीच्या उंबरठ्यावर येतात. ज्या चुकांमुळे देवी लक्ष्मी कोपते.
जाणूनबुजून किंवा नकळत माणूस अशा चुका करतो ज्यामुळे धनाची देवी नाराज होते. अशी कोणती गोष्ट आहे ? जाणून घेऊयात.
चाणक्य म्हणतात, धन लक्ष्मी खूप चंचल आहे. जे आपल्या संपत्तीचा गर्व करतात.
अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च करतात ते स्वतःच्या विनाशाचा मार्ग निवडतात.
चाणक्याच्या मते, जो व्यक्ती वेळेला मूल्य मानत नाही त्याला लक्ष्मीची साथ मिळत नाही.
जो व्यक्ति आई-वडिलांना शिवीगाळ करतो, त्यांना नेहमी पैशाची चणचण भासत असते.
चाणक्य सांगतात की, ज्याला राग, अहंकार, जुगार, यांसारख्या वाईट सवयी असतात, त्याला देवी लक्ष्मीची कृपा कधीच मिळत नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)