अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक हे अतिशय हुशार असतात.
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो.
मूलांक 8 असलेल्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते.
या मूलांकाचे लोक स्वभावाने चालाख असतात.
परंतु कधी कधी यांची फसवणूक होते.
ते समोरच्यावर लगेच विश्वास ठेवतात. कोण खरं, कोण खोटं याची जाणीव त्यांना नसते.
याच्या गोष्टी त्याला आणि त्याच्या गोष्टी याला वाढवून-चढवून सांगण्यात त्यांना रस असतो.
कठोर परिश्रम करुन यश मिळवणं त्यांना आवडतं आणि यामुळेच शनिदेव या लोकांवर नेहमी प्रसन्न राहतात
या लोकांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो, पण हळूहळू ते यशाच्या पायऱ्या चढतात.
कोणतंही काम करताना स्वत:ला त्यात पूर्णपणे झोकून देतात.