अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे त्यांच्या मुलांकावरुन ओळखलं जाऊ शकतं.
3 मूलांक असणाऱ्यांचं व्यक्तिमत्व नेमकं कसं असतं? जाणून घेऊया.
कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो.
मूलांक 3 चा शासक ग्रह बृहस्पति (Jupiter) आहे, जो सर्व ग्रहांचा गुरू मानला जातो.
मूलांक 3 असलेले लोक खूप स्वाभिमानी असतात. या लोकांना कुणासमोर झुकणं आवडत नाही.
या मूलांकाचे लोक धैर्यवान, शूर, सामर्थ्यवान, संघर्ष करणारे आणि कधीही हार मानत नाहीत.
हे लोक खूप महत्वाकांक्षी असण्यासोबतच चांगले विचार करणारे देखील असतात.
या लोकांचे प्रेमसंबंध टिकत नाहीत, परंतु त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते.
कधीकधी त्यांची एकापेक्षा जास्त लग्नं होण्याची शक्यता असते.
त्यामुळे त्यांना त्यांच्या पहिल्या लग्नाचा नेहमीच त्रास होतो.
(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)