अंकशास्त्र देखील ज्योतिषशास्त्राचा एक महत्त्वपूर्ण भाग मानला गेला आहे.
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीच्या स्वभावाची आणि त्याच्या आयुष्याची माहिती त्याच्या जन्मतारखेच्या आधारे केली जाते.
ज्या व्यक्तीचा जन्म 6, 15 आणि 24 तारखेला झाला, त्यांचा मूलांक 6 असतो. या लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते.
6 क्रमांकाचे लोक शारीरिकदृष्ट्या मजबूत आणि दिसायला सुंदर असतात. या लोकांचे म्हातारपण लवकर दिसून येत नाही.
या मुलांकाचे लोक आपल्या आयुष्याच्या लहान वयात यशाची पायरी चढतात.
हे लोक कलाप्रेमी असतात आणि सौंदर्याकडे लवकर आकर्षित होतात.
6 मूलांकाचे लोक त्यांच्या आयुष्यात खूप नाव आणि प्रसिद्धी कमावतात. मात्र यासाठी त्यांना मेहनत घ्यावी लागते.
अंकशास्त्रानुसार, शुक्राच्या कृपेने 6 मूलांकाने जन्मलेले लोक त्यांच्या आयुष्यात खूप पैसा कमावतात.
त्यांना आयुष्यात कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही. त्यांची अर्थव्यवस्था खूप चांगली असते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)