अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक स्वभावाने फार रागीट असतात
यांना कुठल्याही गोष्टीचा राग लगेच येतो आणि त्यावरुन ते समोरच्यावर लगेच भडकतात.
मग पुढे कोणीही वयाने मोठा असो कोणाला ही सोडत नाही.
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो.
मूलांक 9 च्या लोकांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो.जो राग, उत्साह आणि ऊर्जेचा कारक आहे.
या लोकांच्या आत आत्मविश्वास कसून भरलेला असतो. कोणतीही जोखम घ्यायला ते अजिबात घाबरत नाहीत.
यासोबत ते सगळ्याच गोष्टीत उत्साही असतात. त्यांच्यात निडर आणि धाडसी स्वभाव भरभरून असतो.
9 मूलांकाच्या लोकांना शिस्त पाळायला खूप आवडते. त्यांना प्रत्येक गोष्ट टापटीप लागते.
9 या मुलांकाचे लोंग शैक्षणिक क्षेत्रात अव्वल असतात. ते नेहमी पहिला येण्याचा विचार करतात.
या मूलांकाच्या लोकांना जर एखाधि गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर स्वतःच्या रागावर नियंत्रण गमावून बसतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)