आचार्य चाणक्य म्हणतात की, वृद्धापकाळ हा जीवनाचा एक महत्वाचा टप्पा आहे.
जिथे प्रत्येक व्यक्तीला आनंदी आणि आरामदायी जीवन जगायचे असते.
चाणक्यांनी सांगितले आहे की, वृद्धापकाळात सुख-शांती मिळवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.
ज्यामुळे तुमचे आयुष्य नेहमी निरोगी आणि आनंदी राहण्यास मदत होईल.
जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे, तोपर्यंत तुमच्या नातेसंबंधांवर सर्वत्र मान असेल.
म्हणूनच चाणक्य म्हणतात की, पैशाचा सदुपयोग करा. पैसे वाचवले तर म्हातारपणात कुणासमोर हात पसरायची गरज नाही.
चाणक्य सांगतात की, जी लोकं आपली सर्व कामे वेळेवर करतात, आपली दिनचर्या शिस्तबद्धपणे जगतात.
त्यांना कधीही कोणावर अवलंबून राहावे लागत नाही. तो त्याचे प्रत्येक ध्येय साध्य करतो.
चाणक्य म्हणतात, जेव्हा एखादी व्यक्ती निःस्वार्थपणे एखाद्याला मदत करते.
तेव्हा तो आयुष्यात कधीही दुःखी आणि अस्वस्थ राहत नाही.
तुमची आजची मदत तुमचा भविष्य घडवते. म्हातारपण सुख-शांततेने जाते.मदतीसाठी आपले हात नेहमी पुढे ठेवा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)