अंकशास्त्रानुसार (numerology) या जन्मतारखेचे लोक डोक्याने फार हुशार असतात.
कोणाचा कसा वापर करायचा हे यांना बरोबर समजतं. समोरच्याकडून स्वत:ची कामं ते बरोबर करुन घेतात.
कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो.
बुद्धिमतेच्या बळावर हे लोक सर्व गोष्टी साध्य करतात. या मुलांकाचा स्वामी सूर्य असल्याने त्यांच्यावर सूर्याचा प्रभाव असतो.
कुठे काय बोलायचं आणि कसं वागायचं याचं ज्ञान यांना असतं. माणसं जोडून ठेवण्याची सवय त्यांना असते.
ते कठीण काळात जास्त खचून जात नाहीत. प्रत्येक कठीण काळाला ते ताकदीने सामोरं जातात
आणि नकारात्मक गोष्टींचा परिणाम ते स्वत:वर जास्त होऊ देत नाहीत.
नकारात्मक व्यक्तींपासून देखील ते चार हात लांब राहतात.
त्यांच्या ध्येयावर त्यांचं लक्ष असतं आणि त्याच दिशेने त्यांची वाटचाल सुरू असते.
या मुलांकच्या लोकांना दुतोंडीपणा आवडत नाही आणि त्यामुळेच त्यांना दुतोंडी व्यक्तींचा देखील राग येतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)