अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.
यामध्ये मूलांक 4 असलेल्या लोकांबद्दल देखील काही खास गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत.
मूलांक 4 असलेल्या लोकांचं व्यक्तिमत्व खूप खास असतं, या मूलांकाच्या मुली दिसायला सुंदर असतात.
त्यांचा स्वभावही एकदम मजेशीर असतो.
4, 13, 22 किंवा 31 जन्मतारखेच्या मुली कधी कसलं टेन्शन घेत नाहीत.
त्यांचा अधिपती ग्रह राहू आहे.
या मुली नेहमी स्वत:च्या तंद्रीत असतात, त्या कुणाच्याही अध्यात-मध्यात जास्त पडत नाहीत.
प्रेमविवाहावर त्यांचा विश्वास असतो.
बोलण्यातही असतात चतुर
आर्थिक स्थिती असते मजबूत
चारचौघात उठ-बस यांना आवडते
या लोकांना सुखी जीवन जगणं आवडतं.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)