अनेकदा आपण आपल्या जीवनात ज्या गोष्टींचा विचार करतो, त्या गोष्टींशी संबंधित स्वप्न पडतात.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

त्याचप्रमाणे काही खाद्यपदार्थ आहेत, जे आपल्याला आवडतात आणि जे खाण्याचा आपण विचार करतो.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

स्वप्नात आवळा खाणं :

स्वप्नात स्वतःला आवळा खाताना पाहण्याचा अर्थ असा आहे की, आर्थिक सुबत्तेशी संबंधित तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

Image Source: pexels

आलं खाण्याचा अर्थ :

स्वप्नात आलं खाताना पाहणं सकारात्मकतेचं प्रतिक मानलं जातं. आलं हे सुख, समृद्धी आणि वाढीचं लक्षण मानलं जातं.

Image Source: pexels

स्वप्नात अननस खाणं :

जर तुम्ही स्वप्नात अननस खाताना पाहिलं असेल तर याचा अर्थ असा आहे की,तुम्हाला लवकरच अमाप संपत्ती मिळेल आणि पैशामुळे तुमचं कोणतंही काम थांबणार नाही.

Image Source: pexels

स्वप्नात अक्रोड खाल्ले तर...

स्वप्न असो वा वास्तव, अक्रोड खूप शुभ मानलं जातं. स्वप्नात अक्रोड पाहणं म्हणजे, तुमच्या आयुष्यात सुखाची चाहुल, असंच समजा.

Image Source: pexels

स्वप्नात ओवा दिसणं...

जर तुम्हाला स्वप्न पडलं आणि तुम्हाला एखाद्या खाद्यपदार्थात तुम्ही ओवा टाकत असल्याचं दिसलं, तर तुम्ही दीर्घायुषी व्हाल.

Image Source: pexels

स्वप्नात आईस्क्रिम खाताना पाहिलं तर...

स्वप्नात आईस्क्रीम खाण्याचा अर्थ असा आहे की, तुमचं जीवन आनंदानं आणि शांततेनं भरून जाईल.

Image Source: pexels

टीप : (वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.

यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही )

Image Source: pexels