अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व मुलांक क्रमांकावरून ओळखले जाते.
कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 4 असते.
जाणून घेऊया मुलांक 4 असलेले लोक कसे असतात आणि त्यांचे व्यक्तिमत्व कसे असते.
मुलांक 4 असलेल्या लोकांचा अधिपती ग्रह राहू असतो.
या लोकांच्या हट्टी स्वभावामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
मुलांक 4 असणाऱ्या लोकांना मनासारखे वागायला आवडते.
त्यांना त्यांच्या कामात कोणी अडथळा आणलेला अजिबात आवडत नाही.
हे लोक हट्टी स्वभावाचे असले तरी अतिशय मनमिळाऊ असतात.
या लोकांना स्वतंत्र विचार करायला आवड असते.
त्यांना एकांतात राहायला फार आवडते.