अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक स्वभावाने अत्यंत अल्लड, निर्मळ मनाचे असतात. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो. मूलांक 2 चे लोक अत्यंत निष्पाप आणि निरागस असतात. मूलांक 2 चा शासक ग्रह चंद्र आहे, त्यामुळे स्वभावाने ते चंद्रासारखेच कोमल असतात. लोकांची फसवणूक, खोटं बोलणं यांच्या रक्तात नसतं. मूलांक 2 चे लोक दुसऱ्यांच्या मदतीसाठी नेहमीच एक पाऊल पुढे असतात. या जन्मतारखेच्या लोकांना माणसं लगेच समजत नाहीत, ते प्रत्येकावर विश्वास ठेवतात. मूलांक 2 असलेल्या लोकांना एखाद्या कामात यश न मिळाल्यास ते लगेच निराश होतात. या जन्मतारखेचे लोक स्वभावाने खूप शांत असतात. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)