अंकशास्त्रानुसार मूलांक 1 असलेले लोक डोक्याने फार हुशार असतात. कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. मूलांक 1 चा शासक ग्रह सूर्य असल्याने त्यांच्यावर सूर्याचा प्रभाव असतो. कोणाचा कसा वापर करायचा हे यांना बरोबर समजतं. समोरच्याकडून स्वत:ची कामं ते बरोबर करुन घेतात. 1, 10, 19 किंवा 28 जन्मतारीख असलेल्या लोकांना आपला स्वार्थ बरोबर कळतो. ते आपलं काम समोरच्याकडून बरोबर काढून घेतात. मूलांक 1 चे लोक त्यांच्या पडत्या काळातही सावरतं घेतात. ते जास्त खचून जात नाहीत. मूलांक 1 च्या व्यक्ती बोलण्यात बेधडक असतात, दुतोंडी स्वभाव यांना पटत नाही.