क्रमांक 1 एक हा सूर्याचा अंक आहे. एक हा अंक शुक्राचा प्रभाव असलेल्या 6 या अंकाला पूर्णपणे प्रतिरोधक आहे. या व्यक्तींचा इमोशनल कोशंट हे त्यांच्या एकत्र राहण्यास विरोध करण्यामागचं सर्वात मोठं कारण आहे या दोन्ही जन्मांकांच्या व्यक्तींनी व्यावसायिक भागिदारी करण्यापासून आणि एकमेकांशी लग्न करण्यापासून दूर राहिलं पाहिजे. क्रमांक 1 हा एकट्यानं काम करण्यास अनुकूल आहे. पण, सहा हा अंक तसा नाही. सहा अंकाचा प्रभाव असलेल्यांना इतरांच्या मदतीची किंवा पाठिंब्याची गरज असते. दोन्ही अंकांचा प्रभाव असलेल्या व्यक्तींकडे मजबूत पर्सनॅलिटी क्लास आहेत आणि ते जर एकत्र आले तर मोठे विवाद होऊ शकतात. जर एखाद्या प्रसंगी या व्यक्तींना एकत्र काम करावं लागलं तर त्यांनी मध्यस्थ म्हणून क्रमांक 2 ची मदत किंवा पाठिंबा घेतला पाहिजे. यामुळे त्यांच्यातील वाद मिटवण्यात आणि दीर्घकाळ संवाद प्रस्थापित होण्यास मदत होईल. (वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही )