अंकशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीचं व्यक्तिमत्व, स्वभाव आणि भविष्य त्याच्या जन्मतारखेवरून कळू शकतं. अंकशास्त्रानुसार ज्या मुलींची मूलांक संख्या 5 आहे त्या मुली पती आणि सासरच्यांसाठी भाग्यवान समजल्या जातात तसेच या मुली सासरच्या घरात राज्य करतात या मुली खुल्या मनाच्या असतात. आई-वडिलांच्या घराव्यतिरिक्त त्यांना सासरच्यांकडून आणि पतीकडून खूप प्रेम मिळतं. या मुली त्यांच्या कुटुंबाला सोबत घेऊन जातात. शिवाय, त्या त्यांच्या पतीच्या खांद्याला खांदा लावून चालतात. 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या मुली आनंदी असतात त्या खूप बोलक्या असतात. तसेच, ते त्यांच्या बोलण्यातून समोरच्या व्यक्तीला पटकन प्रभावित करतात.