स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्न हे भविष्यात घडणाऱ्या घटनांचा संकेत मानलं जातं. कधी-कधी अशी स्वप्नेही येतात जी आपल्या नशिबाबद्दल संकेत देतात. स्वप्नामध्ये स्वत:ला नदी किंवा तलावात पोहताना पाहणे शुभ मानले जाते. तुम्हाला धनलाभ होणार आहे, असा स्वप्नाचा अर्थ आहे. स्वप्नामध्ये आंबे दिसणंही शुभ संकेत आहे. याचा अर्थ तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील. धार्मिक यात्रेला गेल्याचं स्वप्न पडल्यास तुमच्यावर दैवी कृपा आहे. स्वप्नामध्ये कमळाचं फूल दिसल्यास तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते. स्वप्नात बासरी दिसणे किंवा स्वतःला बासरी वाजवताना पाहणे हे शुभ लक्षण आहे. तुमच्या परस्पर संबंधांमध्ये गोडवा वाढेल आणि नात्यातील गैरसमज दूर होतील, असा याचा संकेत आहे. टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.