अंक ज्योतिष शास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 हा शनीचा आहे.
शनी या मूलांकाचा स्वामी ग्रह आहे. या ठिकाणी आपण मूलांक 8 चा स्वभाव का असतो ते जाणून घेऊयात.
कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो. अशा लोकांचा स्वभाव फार गंभीर असतो.
तसेच, हे लोक फार अंतर्मुख स्वभावाचे असतात. इतरांसमोर व्यक्त व्हायला यांना फारसं जमत नाही.
तसेच, या लोकांना सोशल मीडियावर आपली पब्लिसिटी करायला आवडत नाही. त्यांना आपल्या कामात मग्न राहायला आवडतं. हे लोक आपल्या कामात मग्न असल्यामुळे यांना लवकर यश मिळतं.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांवर शनीची सदैव कृपा असते. शनीच्या कृपेने यांच्या जीवनात कधीच पैशांची कमतरता भासत नाही.
या लोकांची आर्थिक स्थिती फार चांगली असते. तसेच, पैशांची बचत करणं यांना चांगलं जमतं.
त्यामुळे या मूलांकाचे लोक आर्थिक बाबतीत फार भाग्यवान असतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.