अनेक लोक त्याचा शुभ-अशुभ घटनांशी संबंध लावतात.
प्रचलित कथांनुसार, डोळा फडफडणे याचे स्त्री आणि पुरुषांवर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव पडतो.
पुरुषांचा उजव्या डोळ्यांची फाफनी फडफडत असेल तर ते शुभ संकेत असतात.
एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीत यश मिळणे, नवे आर्थिक लाभ होणे किंवा आनंदाची बातमी मिळणे, याचे शुभ संकेत असतात.
पुरुषांचा डावा डोळा फडफडणे म्हणजेच अशुभ संकेत आणि अडचणी येण्याची शक्यता असते.
महिलांचा उजवा डोळा फडफडणे हे अशुभ संकेत असतात. कौटुंबिक वाद निर्माण होण्याची शक्यता असते.
महिलांचा डावा डोळा फडफडणे हे यशस्वी घडामोडी, धनप्राप्ती किंवा आनंददायी बातमीचे संकेत असतात.
डोळा फडफडण्याच्या बाबतीत विविध वैज्ञानिक आणि पारंपरिक दृष्टिकोन आहेत.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.