लोकसभा निवडणुकाच्या निकालाची उत्सुकता खूप वाढली आहे. कोणाची सत्ता येणार हे कोणाला माहीत नाही.
परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी प्रसिद्ध ज्योतिषी अनिल थत्ते.
यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर मोठा अंदाज वर्तवला आहे.
लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे असं ते म्हणाले.
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, यंदाच्या निवडणुकीत भाजपाने 400 पारचा नाराच लावला होता.
यात सर्वात मोठा वाटा महाराष्ट्राचा असेल असं गृहीत धरलं होतं.
पण, अनिल थत्ते यांचा असा अंदाज आहे की,
35 ते 40 जागा महायुतीला मिळतील
तर 8 ते 13 जागा महाविकास आघाडीला मिळतील.
असं भाकीत अनिल थत्ते यांनी वर्तवलं आहे.