शारदीय नवरात्री आणि विजयादशमी झाल्यानंतर वेध लागतात ते कोजागिरी पौर्णिमेचे. यंदा कोजागिरी पौर्णिमा 16 ऑक्टोबर 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रात पूर्वीपासून चंद्राच्या प्रकाशात मसाला दूध ठेवून त्यानंतर ते सेवन करण्याची परंपरा आहे. पण कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध किंवा दुधाचे पदार्थ सेवन करण्यामागचं कारण काय आहे ते जाणून घ्या. कोजागिरी पौर्णिमा शरद ऋतूमध्ये येते. यावेळी पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागते. अशावेळी शरीराला अधिक ताकदीची गरज असते. ही ताकद म्हणजे कॅल्शिअम आपल्याचा दुधातून मिळते. यामुळे फार पूर्वीपासून आयुर्वेदानुसार, कोजागिरी पौर्णिमेला दुध किंवा दूग्धजन्य पदार्थांचं सेवन करण्याची पद्धत आहे. याशिवाय दुधात ड्रायफ्रुट्स, वेलची पूड, दालचिनी, चारोळी असे पदार्थ मिसळल्याचे दुधाचे औषधी गुण अधिक वाढतात.