दसर्याच्या दिवशी शमीची पानं आपल्या घरात ठेवावीत.
यामुळे घरातील हवा शुद्ध होण्यास मदत होते.
शमी ही तेजतत्त्वरूपी आहे. या आपट्याच्या पानांची देवाणघेवाण होते, त्या वेळी हे तेजतत्त्वरूपी कण आपट्याच्या पानातून तळहाताकडे संक्रमित होतात.
यामुळे जिवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होतात.
आयुर्वेदातही आपट्याचा उल्लेख आहे. आपट्याच्या सालीचा रस पचनसंस्थेच्या रोगांवर वापरला जातो.
मुतखडा विकारात औषधामध्ये आपट्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा.
याची पानं कफ आणि पित्त दोषांवर देखील गुणकारी असल्याचं सांगितलं जातं.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही