आचार्य चाणक्य यांच्या मते, काही लोकांच्या चुकांमुळे त्यांचे खिसे नेहमी रिकामे राहतात. कोणत्याही व्यक्तीनं कधीही विनाकारण पैसा खर्च करू नये, नाहीतर खिसा नेहमी रिकामाच राहील, असं आचार्य चाणाक्य सांगतात. आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यर्थ खर्च करणाऱ्या व्यक्तीच्या हातात पैसा कधीच राहत नाही. आचार्य चाणक्य म्हणतात की, ज्या व्यक्तीला फालतू खर्च करण्याची सवय असते, तो नेहमी संकटात राहतो. त्याला नेहमीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. माणसाला फालतू खर्चाची सवय नसावी. त्यानं पैसे वाचवले पाहिजेत, असं आचार्य चाणक्य सांगतात. (टीप : वर सांगणात आलेल्या बाबी केवळ माहिती म्हणून देत आहोत. यातून ABP माझा कोणताही दावा करत नाही.) आचार्य चाणक्य यांच्या मते, जो व्यक्ती परमार्थासारख्या चांगल्या कामात कधीही पैसा गुंतवत नाही, त्याच्या हातात कधीही पैसा येत नाही. व्यक्तीनं वेळोवेळी परोपकाराची कामं करावीत, त्यामुळे आर्थिक सुबत्ता येते.