हिंदू धर्मात पूजा-पाठ व्यतिरिक्त शुभ कार्यासाठी नारळाचा वापर प्रामुख्याने केला जातो.



नारळाला सर्व फळांमध्ये सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. त्यामुळेच नारळाला श्रीफळ म्हणतात.



पूजेच्या वेळी नारळ अर्पण केला जातो आणि तो फोडून तो प्रसादाच्या स्वरूपात खाल्ला जातो.



पूजेसाठी वापरला जाणारा नारळ फोडल्यानंतर तो खराब निघतो असं अनेकदा होतं.



पूजेच्या वेळी नारळ खराब निघाला तर त्याचे नेमके कोणते संकेत आहेत ते जाणून घेऊयात.



नारळ फोडताना जर नारळ खराब निघाला तर, असं म्हटलं जातं की, देवाने प्रसाद ग्रहण केला आहे.



देवाने तुमच्या पूजेचा स्वीकार केला आहे आणि तो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल असा देखील याचा अर्थ होतो.



देवाला दाखवलेला नारळ जर स्वच्छ आणि चांगला निघाला तर तो प्रसाद म्हणून स्रवांना वाटावा.



देवाचा प्रसाद जितक्या लोकांना वाटाल तितकं पुण्य तुम्हाला मिळतं



हिंदू धर्मशास्त्रात नारळाला श्रीफळ म्हणतात. कारण यामध्ये देवी लक्ष्मीची कृपा असते अशी मान्यता आहे.