झोपेत पडणारी काही स्वप्नं चांगल्या स्वरूपाची असतात, तर काही स्वप्नं भीतिदायक असतात.
स्वप्नात एखादा वन्य प्राणी, सर्प, मृत व्यक्ती आदी बाबी पाहिल्या गेल्या, तर साहजिकच भीती वाटते.
एखाद्या व्यक्तीला झोपेत भीतिदायक स्वप्न पडलं, तर ती झोपेतून घाबरून उठते; मात्र काही जणांना एखादी गोष्ट वारंवार स्वप्नात दिसते.
अशा वेळी रात्री झोपेत पडणाऱ्या नकोशा स्वप्नांमुळे अनेक जण त्रस्त असतात.
वास्तुशास्त्रानुसार, झोपण्याच्या दिशेचा स्वप्नांवर परिणाम होतो. रात्रीच्या वेळी झोपताना चुकूनही उत्तर किंवा पश्चिमेला डोकं नसावं.
तुम्ही असे झोपत असाल, तर नकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत सहज पोहोचतात.
कधी कधी अशा व्यक्तींनी रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालिसाचं पठण करावं. हनुमानाचं नामस्मरण केल्याने संबंधित व्यक्तीची सर्व प्रकारची भीती नाहीशी होते आणि रात्री भीतिदायक स्वप्नं पडत नाहीत,
तुमच्या ज्या देवावर विश्वास किंवा श्रद्धा आहे, त्या देवाचं झोपण्यापूर्वी नामस्मरण केल्यासदेखील उपयोग होतो.
रात्रीच्या वेळी भीतिदायक स्वप्नं पडत असतील आणि त्यामुळे तुमचं मन व्यथित होत असेल तर या गोष्टी टाळण्यासाठी भगवान शंकर किंवा भगवान भैरवाची उपासना करा.
या दोन्ही देवतांची पूजा केल्याने भीतिदायक स्वप्नं पडणं बंद होतं, असं मानलं जातं. स्वप्नं आणि झोपायचा बेड यांचा परस्परांशी संबंध असतो.
वारंवार भीतिदायक किंवा वाईट स्वप्नं पडत असतील तर बेडकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. झोपण्याची जागा किंवा बेड स्वच्छ राहील याची दक्षता घेणं आवश्यक आहे.
तसंच झोपण्यापूर्वी हात-पाय स्वच्छ धुवावेत आणि स्वच्छ कपडे परिधान करून मग झोपावं.
तर एका कापडात थोडी लवंग आणि वेलची बांधून ते जवळ ठेवावं. यामुळे वाईट, भीतिदायक स्वप्न पडणं बंद होऊ शकतं.