त्यानुसार, यंदा 5 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज कार्तिक पौर्णिमा साजरी केली जातेय.

कार्तिक पौर्णिमेला दीपदान करणं किंवा दिवा लावण्याचे महत्त्व आहे.

दिवाळीसारखेच या दिवशीही लोक घरात आणि अंगणात दिवे लावतात.

मात्र, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नेमके किती दिवे लावावेत असा अनेकांना प्रश्न पडतो.

शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी विषम संख्येत दिवे लावावेत.

कार्तिक पौर्णिमेला 5, 7, 11, 21, 51 किंवा तुम्ही 101 दिवे लावू शकता.

घराच्या अंगणात, मुख्य दरवाजाजवळ, तुळशीजवळ आणि देव्हाऱ्यात दिवा नक्की लावावा.

पूजाघरात दिवा नक्की लावा.

तुमच्या श्रद्धेनुसार तूप किंवा मोहरीचे तेल घालूनही दिवा लावू शकता.