वैदिक पंचांगानुसार, आज 7 जून 2025 चा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: ABP MAJHA

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांना आज महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता होईल, त्यामुळे आवश्यक ती कामे मार्गी लागतील.

Image Source: ABP MAJHA

वृषभ रास (Taurus)

आज तुमची बुद्धिमत्ता आणि ग्रहण शक्ती यांच्या जोरावर कामाचा दर्जा चांगला ठेवाल.

Image Source: ABP MAJHA

मिथुन रास (Gemini)

आज महिला थोड्या लहरी बनतील, तुमचे अंतर्मन काय साद घालते आहे याचा अंदाज जवळचे लोक निश्चित घेतील.

Image Source: ABP MAJHA

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांनो चिवटपणाने अनेक कामे मार्गी लावाल.अनेक धाडसी निर्णय सर्व आघाडीवर घ्यायला अजिबात मागे पुढे पाहणार नाहीत.

Image Source: ABP MAJHA

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांनो तुम्ही केलेले काम आणि तुम्हाला मिळणारा मोबदला याचे गणित उत्तम जमल्यामुळे काम करण्याचे समाधान मिळेल.

Image Source: ABP MAJHA

कन्या रास (Virgo)

: आज कर्तव्याला वाहलेले कष्ट त्यामानाने जास्त असतील, तरीसुद्धा एक वेगळाच आत्मविश्वास मनामध्ये जागेल.

Image Source: ABP MAJHA

तूळ रास (Libra)

आज भविष्यातील कामासाठी तत्परता दाखवाल, वडिलोपार्जित इस्टेटचा प्रश्न मात्र रेंगाळत पडेल .

Image Source: ABP MAJHA

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज महिला बौद्धिक क्षेत्रात जास्त रमतील, दुसऱ्यांना सतत मदतीचा हात द्याल.

Image Source: ABP MAJHA

धनु रास (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांना आज घरामध्ये सुख मिळेल त्यामुळे घरी जास्त रमाल.थोडा आळस जाणवेल.

Image Source: ABP MAJHA

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांनो आज व्यवसायात कामाकडे जरा दुर्लक्ष होईल त्यामुळे लाभही कमी मिळेल.

Image Source: ABP MAJHA

कुंभ रास (Aquarius)

आज तुम्हाला कामानिमित्त प्रवासाच्या संधी उपलब्ध होतील, एखादी आर्थिक गुंतवणूक होऊ शकेल.

Image Source: ABP MAJHA

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांनो आज तुम्ही केलेल्या महत्त्वाच्या कामांची नोंद वरिष्ठांनी घ्यावी, त्यासाठी जास्त कष्ट घेण्याची तयारी दाखवावी.

Image Source: ABP MAJHA

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJHA