वरच्या दर्जाच्या अधिकारी असलेल्या लोकांमध्ये उठ-बस होईल.
लोकांकडून कामे करून घ्याल. वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील.
घरामध्ये हलकेफुलके वातावरण राहील. महिलांनी आपल्या करिअरचा विचार आवश्य करावा.
आज व्यवहारी बनाल कामासाठी जरा जास्तच कष्ट घ्यावे लागतील.
घरामध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाले तरी गोष्टी टोकाला नेऊ नका.
नोकरी व्यवसायामध्ये वरिष्ठांची गैरमर्जी झाली तरी डोके शांत ठेवावे लागेल.
घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल.
नोकरीतील आजूबाजूचे वातावरण जरा तापलेलेच राहील.
आपले काम कर्तव्य म्हणून समजून केले तर अडचणी कमी होतील.
अति उत्साह किंवा अति निराशा दोन्ही टाळायला लागतील.
आज स्वभावात काहीसा बदल जाणवेल. महिलांना इच्छापूर्तीसाठी कष्ट घ्यावे लागतील.
आज तुमचा थोडा संथपणा आणि आळशीपणा तुम्हाला नडणार आहे.