आज तुम्ही दुसर्यांच्या योग्य सल्ल्याचा आदर निश्चित कराल. पैशाबाबत उदार आणि खर्चिक बनाल.
आज तुमच्या बोलण्यात अहंकार जाणवेल. नेत्रविकाराला तोंड द्यावे लागेल.
घशाच्या विकारासाठी डॉक्टरला भेट द्यावी लागेल. तुमच्या कलागुणांना वाव मिळेल.
आज तुमचे विचार इतरांना सादर करण्यात तुम्हाला आनंद वाटेल. दुसऱ्यांना अडीअडचणीच्या काळात मदत कराल.
तुमच्या तडफदार स्वभावाला सखोल चिंतनाची साथ मिळेल. कोणतेही काम करताना विचारपूर्वक करा.
महिलांनी आज चुकीचे निर्णय घेऊ नयेत. अति भावनाप्रधानतेमुळे निराशा पदरात पडेल.
आज स्वतःच्या कोषातून बाहेर यावे लागेल. नाहीतर अपेक्षाभंगाचे दुःख पदरात पडेल.
कौटुंबिक स्तरावर तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. तुमची दुर्दम्य इच्छाशक्ती यासाठी उपयोगी पडेल.
संततीकडून थोडा त्रास संभवतो. त्यांच्या आधुनिक विचाराशी जुळवून घ्यावे लागेल.
मुलांच्या शिक्षणात अडथळे संभवतात.अति महत्त्वाकांक्षा अविवेकी वागण्याकडे घेऊन जाऊ शकते.
कधी न येणारा अनुभव आज येऊ शकतो. चारचौघांपेक्षा वेगळे काहीतरी करण्याची प्रवृत्ती बळावेल.
आर्थिक घडी बसवण्यासाठी कर्जाचा आधार घ्यावा लागेल. महिलांच्या क्षमतेला प्रोत्साहन मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)