आज तुम्ही डोळ्यांच्या त्रासाने हैराण होऊ शकता. यासाठी हलगर्जीपणा करू नका, वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.
आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. बीपीच्या त्रासाने त्रस्त असू शकता.
ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. घरातून विनाकारण बाहेर पडू नका.
आज तुमचे आरोग्य चांगले असेल. फक्त अॅसिडीटीचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा.
आज तुम्हाला लो बीपीच्या कारणाने अशक्तपणा जाणवू शकतो. जास्त कामाचा ताण घेऊ नका.
तुमचे आरोग्य चांगले राहील. कोणत्याच प्रकारचा ताण स्वत:वर ओढून घेऊ नका.
दमा आणि खोकल्याचा त्रास असलेल्यांना आणखी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, म्हणूनच तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत थोडं सतर्क राहिलं पाहिजे.
आजार किरकोळ असो किंवा मोठा आजार, तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल बेफिकीर न राहिल्यास बरं होईल. किरकोळ समस्या आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.
आज तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. पोटदुखी किंवा खोकल्याची समस्या तुम्हाला खूप त्रास देऊ शकते.
तुमच्या तब्येतीची काळजी घेण्यात कोणताही हलगर्जीपणा करू नका. अन्यथा दिर्घकालीन आजार पुन्हा उद्भवू शकतो.
महिला चेहऱ्याशी संबंधित समस्याने त्रस्त असू शकतात. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.
आज कोणतीही जड वस्तू उचलताना काळजी घ्या. वातावरणातील बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणा होऊ शकतो.