आचार्य चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला आर्थिक नुकसान झालं तर ते कधीच जाहीर करू नका.
तुमच्या पाठीमागे ते तुमच्यावर हसून तुमचा आनंद घेतील.
काहींना घरातील वाद चव्हाट्यावर आणण्याची सवय असते.
काही जण घरातील वाद मित्रांसोबत किंवा इतर लोकांसोबत शेअर करतात, पण ही गोष्ट टाळली पाहिजे.
तुमचा कधी कोणी अपमान केला असेल, तर याची कोणासमोर वाच्यता करू नये.
तुम्ही ज्या व्यक्तीला ही गोष्ट सांगाल, ती व्यक्ती तुमच्याबाबत चुकीचा विचार करू शकते.
अनेकवेळा कशा ना कशाच्या बाबतीत आपली फसवणूक होते.
तुमच्या बौद्धिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतात.