व्यवसाय धंद्यामध्ये उच्चपदस्थ व्यक्तींचा सहवास लाभेल. त्याचा फायदा धंद्यासाठी आवश्य करून घ्या.
सहवासातील वृद्ध व्यक्तींचा सल्ला अवश्य विचारात घ्या. धार्मिक कार्यांमध्ये सहभाग घ्याल.
कधीतरी अति संवेदनशीलतेमुळे निराश होण्याचे योग येतील. एखाद्याबद्दल खूप अनुकंपा वाटेल आणि त्यांना मदतही कराल.
जवळच्या नात्यांमधून अपेक्षाभंगाचे दुःख अनुभवाल. कोठेही अंधविश्वास ठेवून काम करू नका.
एखादे आव्हान पेलण्याचे मनोरथ कराल, परंतु आपल्या जवळच्या सामर्थ्याचा अंदाज घ्या. नाहीतर निराशा पदरात पडेल.
वैवाहिक जीवनात काही त्रास संभवतील. महिला थोड्या विसरभोळ्या बनतील.
आज आरोग्याची काळजी घ्यावी. मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. थोडेसे लहरी आणि विक्षिप्त बनाल.
कोणत्याही कामाचा जास्त ताण घेऊ नका. अति परखड बोलण्याने जवळच्या लोकांची मने दुखावली जातील.
नोकरीत वरिष्ठांशी जमणार नाही. कामामध्ये सतत नाविन्य शोधण्याकडे आणि बदलण्याकडे कल राहील.
संपत्ती स्थितीमध्ये चढ-उतार होऊ शकतात. मुलांच्या विचित्र वागण्यामुळे थोडे वैतागून जाल.
घरामध्ये कित्येक वेळा एकांगी विचार कराल आणि असे विचार जवळच्या लोकांना रुचणार नाही.
महिलांनी ताण कमी करण्यासाठी प्राणायाम आणि ओंकार याचा आधार घ्यावा. व्यापारातील बौद्धिक झेप वाढेल.