आज व्यवहारामध्ये धूर्तपणा दाखवणार आहात.
तरुणांचे विवाह ठरले तरी काही कारणामुळे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
प्रेम प्रकरणांमध्ये तरुणांना यश मिळेल.
आज खूप स्वप्न रंगवाल आणि त्याप्रमाणे वाटचाल सुरू कराल.
जुन्या विचारांना उजाळा द्याल. नोकरी-व्यवसायात प्रचंड कष्ट पडतील.
काळजी करण्यापेक्षा काळजी घेण्याची सवय अंगी बाळगा.
आज आत्मविश्वास आणि उत्साहाचा भाग वाढवावा लागेल.
आर्थिक घेणी लांबण्याची शक्यता आहे. अपेक्षित संधी क्वचितच लाभतील.
आज हुशारी आणि उद्योगप्रियेतेमुळे यशाला खेचून आणाल.
महिलांना घरात तडजोडी कराव्या लागतील. व्यवहार चातुर्य उत्तम राहील.
आज कोणत्याही गोष्टीमध्ये वेळ मारून देण्यात हुशारी दाखवाल.
सरकारी कामांमध्ये पूर्वीपासून येणारे अडथळे दूर होऊन जातील, त्यामुळे कामांना वेग येईल.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.