आज व्यवसायात फायदा होईल. परदेश गमनाचे बेत ठरवाल.
आज काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागेल.
पैशाची मुबलकता नसली तरी गरजेपुरते पैसे हातात पडतील.
महिलांच्या आचार विचारांना चांगले वळण मिळेल. लोकांना संघटित करण्याबाबत विशेष रुची ठेवाल.
राजकारणी लोकांना आपल्या कामांमध्ये अडथळे आले तरी चिकाटी ठेवून काम पुढे नेण्याची जबाबदारी ठेवावी लागेल.
लेखकांना आपल्या वाङ्मयाचा व्यासंग वाढवता येईल. प्रेम प्रकरणात अडथळे संभवतात.
काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा प्रत्यय आज घेणार आहात.
व्यवसाय धंद्यातील कामाला वेग येईल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून मदतीचे आश्वासन मिळेल.
कोणत्याही निर्णयात अथवा बोलण्यात ठामपणा राहणार नसल्यामुळे कामाची गती मंदावेल.
आज थोडा निष्काळजीपणा वाढेल. नको तेथे पैसा खर्च करण्याची प्रवृत्ती राहील.
व्यवसाय नोकरीत बढाया मारून चालणार नाही. थोड्या एककली स्वभावामुळे विसरभोळेपणा वाढेल.
आज कोणाला जामीन राहू नये. महिलांची धार्मिक, अध्यात्मिक गोष्टीत आवड निर्माण होईल.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.