मेष (Aries)

आज आक्रमक बनल्यामुळे थोडे अडचणीत याल. समाजात घडणाऱ्या घडामोडींचे ज्ञान चांगले घ्याल.

वृषभ (Taurus)

व्यवहारात लागणारी कल्पकता तुमच्याकडे असल्यामुळे अपेक्षित यश मिळेल. राजकीय क्षेत्रात पुढे आणणारे ग्रहमान आहे.

मिथुन (Gemini)

गुप्त शत्रूंचा थोडा त्रास झाला तरी तुमच्या समोर शत्रू नांगी टाकतील. महिला मिळालेल्या संधीचा चांगला उपयोग करून घेतील.

कर्क (Cancer)

तुमच्या नेतृत्वाला लोक दाद देतील. पुढारी पण आणि अधिकार मिळेल.

सिंह (Leo)

खूप दिवस वाट पाहत असलेले आर्थिक प्रश्न सुटणार आहेत. थोडीशी चैन खरेदीचा मोह होईल.

कन्या (Virgo)

घरातील काही गोष्टींसाठी पैसा खर्च कराल. कुटुंबात खेळीमेळीचे आनंदी वातावरण राहील.

तूळ (Libra)

आज मनस्वास्थ्य मिळेल परंतु तुमच्या मुडी स्वभावाचे दर्शन ही इतरांना घडेल.

वृश्चिक (Scorpio)

खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असा मूड राहील त्यामुळे आनंद निर्भेळ उपभोगू शकणार नाही.

धनु (Sagittarius)

वाहने जपून चालवा. प्रकृती स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे.

मकर (Capricorn)

एखाद्या विचाराने संकटे ओढून घ्याल. आपली महत्त्वाकांक्षा पुरी करण्यासाठी नको त्या मार्गाचा अवलंब न करणे चांगले.

कुंभ (Aquarius)

आज दुटप्पी वर्तन ठेवाल. कोणतेही काम पूर्ण होईपर्यंत घोषणा करू नका.

मीन (Pisces)

महिलांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुमच्याशी जे गोड बोलतील त्या व्यक्ती तुमच्या मर्जीत शेवटपर्यंत राहतील.