मनातील सुप्त इच्छा पूर्ण होतील. नशिबाची साथ मिळेल.
दूरच्या प्रवासाचे योग येतील. व्यवसायात पुढे काही गाठायचं आहे हा निश्चय कराल.
आत्मविश्वासाचं बोट धरून चालत राहिलात तर नशिबाची साथ मिळणार आहे.
नवीन नोकरी-व्यवसायाला सुरुवात करायला हा उत्तम काळ आहे. मन समाधानी राहील.
समस्या आल्या तरी त्या अनेकदा संधी असू शकतात, यावर विश्वास ठेवा.
कष्टाची तयारी ठेवा आणि कामाला लागा, असा ग्रहांचा संदेश आहे.
समोरच्या माणसाला आपलेसे करून काम साध्य करण्याची क्षमता तुमच्याकडे राहील .
स्पर्धकांनी अचानक केलेली तुमच्याविरुद्धची एखादी हालचाल तुम्हाला सर्व बाबतीत महागात पडण्याची शक्यता आहे.
तुमच्या उत्तम बौद्धिक कारवायांनी शत्रूचं पानिपत नक्कीच कराल. महिला करिअरकडे लक्ष देतील.
कधी न झालेल्या प्रकृतीच्या एखाद्या त्रासाला तोंड द्यावे लागेल.
त्वचारोग किंवा मेंदूच्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कोणतेही निर्णय विचार करून घ्यावेत.
परिस्थितीशी झगडण्यात बराच वेळ खर्च होईल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास बळावेल.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)