आज नोकरीधंद्याच्या ठिकाणी उलाढाल निश्चित कराल.
आज वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. वाहने जपून चालवा.
हाडाची दुखणी डोके वर काढतील. कलाकारांच्या कलांची आणि कार्यशक्तीची कुचंबणा होऊ शकते.
बरोबरीचे लोक पुढे जातील परंतु तुम्ही थोडे मागे पडल्यामुळे निराश व्हाल. महिलांच्या गुणांची कदर होणार नाही.
आज कोणत्याही संघर्षाला तुम्ही तयार राहणार आहात. कोणतेही महत्त्वाचे निर्णय आज न घेतलेलेच बरे.
पैशाची अडलेली कामे पार पडतील. याबाबत मध्यस्थ म्हणून जवळच्या मित्रांचा खूप उपयोग होणार आहे.
मोठ्या भावंडांची साथ चांगली मिळेल. वडिलोपार्जित एसटी संबंधी कामे लांबतील.
कुटुंबात थोडा ताणतणाव जाणवला तरी प्रेम पूर्वक वातावरणात सर्व ताण विरून जाईल. महिलांनी आपला अहंकार बाजूला ठेवावा.
नोकरी व्यवसायातील महत्त्वाची कामे उरकून घ्या. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे.
वैवाहिक जीवनात तुमच्या मनासारख्या गोष्टी जोडीदाराकडून न झाल्यामुळे वाद संभवतात महिलांनी तरजोडीचे धोरण स्वीकारावे.
आज सर्व बाबतीत तडजोड करावी लागणार आहे प्रवासाचे योग येतील.
इतरांशी वादविवाद टाळावे लागतील. सर्व प्रकारच्या वृत्तींना लगाम घालावा लागेल.