मेष (Aries)

आज हाताखालच्या लोकांवर अविश्वास दाखवू नका. आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील.

वृषभ (Taurus)

खूप पूर्वीपासून केलेल्या कामाच्या नियोजनाला यश लागेल. कलाकारांना वेगवेगळ्या संधी मिळतील.

मिथुन (Gemini)

जोडीदाराचे सहकार्य उत्तम लाभेल. विवाह करू इच्छिणाऱ्यांना हवा तसा जोडीदार लाभेल.

कर्क (cancer)

घरात मंगल कार्य ठरतील. महिलांना आपले करिअर करण्याची संधी मिळेल.

सिंह (Leo)

वैवाहिक जीवनात थोडे वादळ निर्माण होईल. अशावेळी एकमेकांनी समजूतीचे धोरण स्वीकारा.

कन्या (Virgo)

आरोग्याच्या बाबतीत प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ज्यांना उष्णतेचा त्रास, पित्ताचा त्रास आहे त्यांनी सावध राहावे.

तूळ (Libra)

स्वतःचे काम स्वतः करण्यावर भर द्यावा. मनुष्य परिस्थितीचा गुलाम असला तरी कर्म तुमच्या हातात नक्कीच आहे.

वृश्चिक (Scorpio)

जेवीन तर तुपाशी, नाहीतर उपाशी ही वृत्ती आज चालणार नाही. नोकरी व्यवसायात कामाचे जेवढे नियोजन कराल तेवढे यश चांगले मिळेल.

धनु (Sagittarius)

आज तुमची चिकाटी वाखाणण्यासारखी असेल. महिलांच्या धोरणीपणाचा त्यांना फायदा होईल.

मकर (Capricorn)

तुमच्या स्थिरचित्ताचा आज तुम्हाला उपयोग होणार आहे. लोकांनी केलेल्या प्रतिकाराला तुम्हाला उत्तर द्यावे लागेल.

कुंभ (Aquarius)

दुसऱ्याला प्रत्युत्तर देण्यात तुम्ही कुठेही कमी पडणार नाही. समाजासमोर येऊन इतरांची मने जिंकाल.

मीन (Pisces)

आज जरा जास्तच कष्ट घ्यावे लागतील. नोकरी व्यवसायात अडलेली कामे मार्गी लागतील.