वैदिक पंचांगानुसार, आज 10 जून 2025 चा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: ABP MAJHA

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांनो आज हमखास एखादी गोष्ट हक्काने जवळच्या व्यक्तींकडून करून घ्याल.

Image Source: ABP MAJHA

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांनो आज सभोवतालच्या लोकांना जास्तीत जास्त आनंद द्याल, एकंदरीत चांगल्या गोष्टीची नोंदी आज कराल.

Image Source: ABP MAJHA

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांनो आज भावंडां बरोबर मतभेद झाले तर, त्याची कारणे न समजल्यामुळे थोडेसे गोंधळून जाल.

Image Source: ABP MAJHA

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांनो आज खूप काही करायची उर्मी मनामध्ये बाळगेल, त्यामुळे नोकरी धंद्यात अडकलेली कामे उत्साहाने मार्गी लावाल.

Image Source: ABP MAJHA

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांनो आज आर्थिक स्थिती सुधारेल महिलांनी थोडा तापटपणा ताब्यात ठेवावे.

Image Source: ABP MAJHA

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांनो आज संतती सौख्य मिळेल, मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळेल.

Image Source: ABP MAJHA

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांनो आज कुठे काय बोलावे हे, त्यांना न कळल्यामुळे काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे.

Image Source: ABP MAJHA

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत नोकरी धंद्याच्या ठिकाणी तुम्हाला सामावून न घेतल्यामुळे मनातून जरा खट्टू व्हाल.

Image Source: ABP MAJHA

धनु रास (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांनो आज काही बाबतीत थोडा अंतर्मुख होऊन विचार केला तर समाधानी राहाल.

Image Source: ABP MAJHA

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांनो आज मित्र-मैत्रिणीच्या सहवासात रमून जाल, व्यवसायात भीक नको पण कुत्रा आवर म्हणायची वेळ येईल.

Image Source: ABP MAJHA

कुंभ रास (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांनो आज कामाच्या ठिकाणी इतर पर्यायांकडेही लक्ष द्यावे लागेल, कधी कधी धरलं तर चावत आणि सोडलं तर पळतं अशी ही अवस्था होऊन जाईल.

Image Source: ABP MAJHA

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांनो आज सर्व ठिकाणी समतोल राखावा लागेल, नाही तर -त्या गोष्टींमध्ये अडेल तट्टूपणा केला नाही तर फायद्याचे ठरेल.

Image Source: ABP MAJHA

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJHA