आज डोळ्यांच्या विकारापासून सावधानता बाळगा. महिला ज्या कलेशी निगडित असतील त्यांना संधी मिळतील.
तुमच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारचा रुबाब आढळेल. आपला मान सांभाळाल.
जनमाणसात स्वतःची प्रतिमा चांगली निर्माण करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील.
धाडस साहस हातात हात घालून जातील, त्यामुळे काम करण्याचा वेग वाढेल.
मनावर ताबा राखण्यासाठी मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागतील.
तुमच्या बोलण्यामुळे कोणी दुखावत नाही ना याची काळजी घ्यावी लागेल.
आज थोडासा वाद घालण्याचा मूड राहील. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.
वाणी जपून चालवा. घरातील मोठ्या लोकांशी थोडे वाद संभवतात.
कोणत्याही बाबतीत स्वतंत्र विचार केल्यामुळे मला जोगते वागता येईल.
महिला थोड्या उधळ्या बनतील. नोकरी व्यवसायात योग्य संधी मिळतील.
सत्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत जहालपणे लढा द्याल.
पारंपरिक विचार बदलून आधुनिकतेकडे झुकाल. कामामध्ये संघर्ष संभवतो.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.